Jio AirFibre बाबत मुकेश अंबानींची मोठी घोषणा; 19 सप्टेंबर गणेश चतुर्थीच्या दिवशी होणार लॉन्च

ब्युरो न्युज (मुंबई) : जियो युजर्स गेल्या अनेक दिवसांपासून जियोच्या एअर फायबरची आतुरतेनं वाट पाहत होते. आजच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना मुकेश अंबानींनी जियो एअर फायबरबाबत मोठी घोषणा केली आहे. जियोच्या एअर फायबरची प्रतीक्षा संपली आहे. गणेश चतुर्थी म्हणजेच, 19 सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहे. Jio Air Fiber 5G नेटवर्क आणि अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान वापरून घर आणि कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा प्रदान करेल. जियो एअर फायबरच्या लँडिंगमुळे दूरसंचार क्षेत्रात उलथापालथ होण्याचीही शक्यता आहे.

मुकेश अंबानी AGM म्हणाले की जियो एअरफायबरसाठी दररोज 150,000 कनेक्शन दिले जाऊ शकतात. त्याच्या लॉन्चच्या तारखेची घोषणा करताना ते म्हणाले की, Jio AirFiber गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच, 19 सप्टेंबर रोजी लॉन्च होईल. मुकेश अंबानी RIL AGM 2023 मध्ये म्हणाले की, Jio 5G मध्ये आपल्या अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रात बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. यामध्ये कृषी, शिक्षण, एमएसएमई आणि आरोग्य सेवा यांचा समावेश आहे.

आरआयएलचे सीएमडी मुकेश अंबानी म्हणाले की, कंपनीचे जिओसाठी 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं लक्ष्य आहे. Jio हे नवीन भारताच्या डिजिटल परिवर्तनाचं प्रतीक आहे आणि त्यानं आपल्या ध्येयाकडे मोठी पावलं उचलली आहेत. Jio 5G चं रोलआउट जगातील कोणत्याही कंपनीद्वारे सर्वात वेगवान 5G रोलआउट आहे.

error: Content is protected !!