२०२३ चा कोकण उद्योगरत्न – पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र उद्योजक विशाल जाधव यांना मुंबई मध्ये झाले पुरस्काराचे वितरण

पद्मश्री गजानन माने, निवृत्त सचिव चंद्रकांत माने‌ यांच्या हस्ते झाले वितरण

खारेपाटण (प्रतिनिधी): कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा यंदाचा कोकण युवा उद्योजक पुरस्कार -२०२३ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील कोळपे या गावचे सुपुत्र तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष युवा उद्योजक विशाल जाधव यांना जाहीर झाला असून नुकताच या पुरस्कार वितरणाचा सोहळा मुंबई,डोंबिवली येथील मराठा हितवर्धक मंडळ हॉल येथे संपन्न झाला. पद्मश्री गजानन माने व निवृत्त सचिव चंदकांत माने यांच्या शुभहस्ते यावर्षी मानाचा कोकण उद्योग रत्न पुरस्कार युवा उद्योजक विशाल जाधव यांना सन्मानपूर्वक देण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनाआमदार डॉ. राजनजी साळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. तर माजी परिवहन सभापती राजेश कदम, प्राध्यापक डॉ विनय भोळे, उद्योजक विश्वास चव्हाण आदी मान्यवर उपस्थित यावेळी उपस्थित होते. कोकणची माती सोडून न जाता इथेच राहून एक यशस्वी उद्योजक होऊ शकतात, व स्वतःबरोबर इतर कुटुंबांना देखील रोजगार मिळवून देता येतो.. याचे मूर्तीमंत उदाहरण‌ म्हणजे उद्योजक विशाल जाधव होय.त्यांनी हे प्रत्यक्ष दाखवून दिलेले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उद्योग क्षेत्र निवडले मेहनत व चिकाटीच्या जोरावर उद्योग यशस्वी देखील करून दाखवला आज एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल व उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांना यावर्षीचा कोकण उद्योगरत्न हा पुरस्कार देण्यात आला . कोकणात उद्योजक घडविण्यासाठी देखील विशाल जाधव विविध संस्थांच्या माध्यमातून काम करत आहेत.. आपल्या कृतज्ञता भाषणात त्यांनी सदरचा पुरस्कार वडीलांना समर्पित केला.. त्यांच्यामुळेच मी उद्योजक म्हणून घडलो. येत्या काळात कोकणातील उद्योग विकास चळवळीसाठी आपण प्रयत्न करणार असून कोकणची युवाशक्ती येथेच थांबवणार असल्याचे देखील युवा उद्योजक विशाल जाधव यांनी यावेळी आपल्या. मनोगतात सांगितले. कोकण युवा प्रतिष्ठान हे मुंबई स्थित असून संपूर्ण महाराष्ट्र व कोकण विभागातील वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक व यश मिळवणाऱ्या व्यक्तींना गेली अनेक वर्ष कोकण युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कौतुकाची थाप देत त्यांना पुरस्कार देऊन गौरविन्याचे कार्य करत आहे.त्याचबरोबर आजपर्यंत या संस्थेच्या वतीने त्यांनी विविध क्षेत्रातील कोकण भूषण – डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई, कोकण समाज भूषण – कै. गोपाळराव नारायण राणे ( मरणोत्तर )कोकण कलायोगी- कै. नितीन चंद्रकांत देसाई ( मरणोत्तर ) आदी मान्यवर व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविले आहे.

error: Content is protected !!