फोंडाघाट रस्त्याचे निकृष्ट काम करून मलिदा खाणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका

भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सा.वा. अधिकाऱ्यांकडे केली मागणी

मे महिन्यात काम केलेला रस्ता पहिल्या पावसात वाहून जातोच कसा ? केला सवाल

कणकवली (प्रतिनिधी): फोंडाघाट रस्ता निकृष्ट दर्जाचा करून ठेकेदाराने मलिदा खाल्लेला आहे. मे महिन्यात केलेला रस्ता जून जुलै मध्येच खड्डे पडून निकृष्ट झाला. एवढे दर्जाहीन काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करा. त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने केली. या संदर्भात लेखी निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अधिकारी अजयकुमार सर्वगोड यांना दिले आहे. ठोस कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. कणकवली तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मिलिंद मिस्त्री यांच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली येथील अधिकाऱ्यांची भेट घेऊन फोंडाघाट रस्त्याचे काम करणारे संबंधित ठेकेदाराविषयी तक्रारीचा पाढा वाचला. यावेळी भाजपचे पदाधिकारी सुभाष मालंडकर, सदानंद चव्हाण लक्ष्मण घाडीगावकर गणेश तळेगावकर, उमेश घाडी, सुशील परुळेकर, प्रज्वल वरदम, अभय गावकर, महेश मेस्त्री प्रशांत राणे, सुदर्शन नाईक, संदीप मेहली, विजय चिंदरकर, सागर राणे वंचित कदम सिद्धेश तळगावकर स्वप्रिल चिंदरकर सौरभ चिंदरकर प्रशांत फाटक सौरव आचरेकर नितीन राणे प्रदीप कदम आनंद घाडी सोहेल खान सतीश हर्मळकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!