श्री देवी आदिष्टी देवी वि.का.स. सेवा सोसायटीचे चेअरमन म्हणून यशस्वी कारकीर्द
वैभववाडी (प्रतिनिधी) : खांबाळे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी श्री देवी आदिष्टी वि.का.स. सेवा सोसायटीचे माजी चेअरमन दीपक चव्हाण यांची नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. खांबाळे सरपंच गौरी पवार यांचे अध्यक्षतेखाली खांबाळे ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली.या सभेत दीपक चव्हाण यांची खांबाळे गाव महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.यापूर्वी त्यांनी श्री देवी आदीष्टी वि.का.स.सहकारी सोयायटी लि. खांबाळेचे चेअरमन पद ही यशस्वीपणे सांभाळले होते.सहकार क्षेत्रासह प्रशासकिय कामकाजाचा ही त्यांना दांडगा अनुभव आहे.अभ्यासु आणि मुद्देसूद मांडणी करण्याचे उत्तम कौशल्य असल्यामुळे खांबाळे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित आहेत.यापूर्वी सुद्धा त्यांनी तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून गावाने दिलेली जबाबदारी लीलया पार पाडली होती.अनेक प्रकरणे त्यांनी आपल्या अध्यक्ष कालावधीत मिटविली होती. योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यात त्यांचा जणू हातखंडाच आहे. त्यांच्या अनुभवाचा विचार करून खांबाळे गावाने पुन्हा एकदा तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी त्यांना जबाबदारी दिली आहे.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके,उपसरपंच गणेश पवार,सोसायटी चेअरमन तथा ग्रामपंचायत सदस्य प्रविण गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य मंगेश गुरव,अमोल चव्हाण,प्राजक्ता कदम, रसिका पवार,दर्शना पवार,निवृत्त कॅप्टन राजाराम वळंजू,ग्रामसेवक नयना गुरखे,कृषी सहाय्यक बालाजी वाघमोडे,मीनाक्षी भुजंग,जेष्ठ ग्रामस्थ रमेश देसाई,मधुकर पवार, दीपक वसंत पवार,आनंद पवार,लवू पवार,रामचंद्र कांबळे,मंगेश कांबळे,मंगेश सूद,गणेश सदाशिव पवार,नंदकुमार पवार,दिनेश पालकर,ओमकार पवार,सत्यवान सुतार,दाजी बरगे,जयेश पवार,मुख्याध्यापक शेट्ये मॅडम,पशुधन पर्यवेक्षक हेदुळकर,आरोग्य सेविका निलम कदम,आशा सेविका शामली देसाई आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.खांबाळे मधील सर्व नागरिकांनी माझ्यावर विश्वास दाखवून माझी गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी सर्वांचा आभारी असून गावातील तंटे गावातच मिटवून कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे नवनिर्वाचित महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.












