नवीन कुर्ली वसाहत प्राथमिक शाळेच्या इमारतीमधील रिक्त खोलीत प्रशासक पाहणार ग्रा. पं. कारभार
कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या हस्ते बहुप्रतिक्षित नवीन कुर्ली ग्रा पं च्या कार्यालयाचे उदघाटन आज करण्यात आले.नवीन कुर्ली वसाहत प्राथमिक शाळेतील इमारतीच्या रिक्त खोलीत ग्रा पं कार्यालय सुरू करण्यात आले असून या जागेतून नवीन कुर्ली ग्रा पं साठी नियुक्त प्रशासक ग्रा पं चा कारभार चालवणार आहेत. यावेळी शिवसेना विधान सभा प्रमुख श्री .संदेश पटेल , शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा नवीन कुर्ली प्रकल्प संघटनेचे कार्याध्यक्ष श्री हरेश पाटील , शिवसेना कणकवली तालुका सचिव तथा नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष श्री. रवींद्र नवाळे , सचिव श्री .आनंद सावंत ,उपाध्यक्ष श्री प्रदीप कामतेकर,श्री .एकनाथ चव्हाण ,श्री .पांडुरंग चव्हाण ,भगवान तेली, राजेश तेली, अरुण दळवी, शांताराम राणे, सत्यवान पवार , प्रमोद पवार , उत्तम तेली, सखाराम हुंबे आदी उपस्थित होते.












