गणेशभक्तांसाठी मोदी एक्सप्रेस !

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आ.नितेश राणेंचा उपक्रम 

भाजपा आ. नितेश राणेंनी चाकरमानी गणेशभक्तांसाठी केली स्पेशल ट्रेनची सोय

17 सप्टेंबर ला दादर हून सुटणार मोदी एक्सप्रेस

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : आ.नितेश राणे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त  मुंबईस्थित कणकवली विधानसभा मतदारसंघातील  चाकरमानी गणेशभक्तांसाठी खुशखबर दिली असून गणेशचतुर्थीसाठी स्पेशल मोदी एक्सप्रेस ची मोफत सोय उपलब्ध करून दिली आहे. 17 सप्टेंबर रोजी दादर रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म नं 8 वरून मोदी एक्सप्रेस ट्रेन दुपारी 12 : 30 वाजता निघणार आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातील मुंबईस्थित गणेशभक्तांसाठी मोफत मोदी एक्सप्रेस ची सोय केल्यामुळे एका अर्थाने गणेशभक्तांना गणपती बाप्पाच पावला आहे. या स्पेशल मोदी एक्सप्रेस मध्ये सर्व गणेशभक्त प्रवाशांची जेवण पाण्याचीही व्यवस्था आमदार नितेश राणे यांनी स्वखर्चाने मोफत उपलब्ध करून दिली आहे. या ट्रेनमध्ये बुकिंगसाठी कणकवली देवगड आणि वैभववाडी तालुक्याच्या भाजपा मंडल अध्यक्षांशी5 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान संपर्क साधण्याचे आवाहन आ.नितेश राणे यांनी केले आहे.

error: Content is protected !!