विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर च्या वतीने रेटिना ( डोळ्यांच्या मागील भाग ) तपासणी 1200 ऐवजी फक्त 599 मध्ये

कोल्हापूर पुणे मुंबईला जायची गरज नाही.. रेटिना तपासणी आता कणकवलीमध्ये उपलब्ध

कणकवली (प्रतिनिधी) : नॅब आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली प्रहार ऑफिस शेजारी यांच्या वतीने रेटिना ( डोळ्यांच्या मागील भाग ) तपासणी शिबिर 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान विवेकानंद नेत्रालय कणकवली येथे आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये 1200 रुपयांची रेटिना तपासणी फक्त 599 रु.मध्ये केली जाणार आहे. रेटिना तपासणीसाठी आता कोल्हापूर पुणे मुंबई येथे जाण्याची गरज नसून कणकवलीमध्येच विवेकानंद नेत्रालयात ही तपासणी उपलब्ध आहे. डोळ्याच्या मागील भागात असलेल्या पडद्याला रेटिना अथवा नेत्रपटल म्हणतात. अचानक दृष्टी कमी होणे,मधुमेहामुळे रक्ताच्या गुठळ्या होणे, वेळेत तपासणी निदान आणि उपचार नाही केले तर दृष्टी कमी होऊन कायमचे अंधत्व येऊ शकते. अस्पष्ट अथवा अस्थिर दृष्टी असेल किंवा तुमच्या दृष्टीमध्ये फ्लोटिंग स्पॉट्स किंवा गोल वर्तुळे असतील, दूरच्या वस्तू अस्पष्ट दिसत असतील किंवा रातआंधळेपणा असेल तर रेटिना तपासणी करणे अत्यावश्यक आहे. रेटिनाची तपासणी करण्यासाठी डोळ्यांतील बाहुली मोठी करून रेटिनाची तपासणी केली जाते. रेटिनाची सोनोग्राफी केली जाते. रेटिनाचा फोटो काढला जातो . यासाठी विवेकानंद नेत्रालय प्रहार ऑफिस शेजारी कणकवली येथे मोबा. 9850849315 / 8408803536 / 02367 -233933 येथे संपर्क साधावा. ( रविवार बंद ).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!