कृषि पायाभूत सुविधा निधी योजने अंतर्गत तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजन
कुडाळ (अमोल गोसावी) : केंद्र सरकार पुरस्कृत आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) योजना अंतर्गत दिनांक ०५/०९/२०२३ रोजी सकाळी १०.३० वा. सहकार महर्षी कै. शिवरामभाऊ जाधव सभागृह, कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघ कुडाळ येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना बँक व्याज दरात ३% सवलत मिळणार आहे. तरी, कुडाळ तालुक्यातील वैयक्तिक प्राथमिक कृषिमाल प्रक्रियादार, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, महिला बचत गट, यांनी वेळीच उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कुडाळच्या वतीने करण्यात येत आहे.












