फोंडयातील पहिला आमदार संजय आग्रेंच्या रुपात व्हावा

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

फोंडाघाट (प्रतिनिधी): जिल्ह्याचे राजकारण हे फोंडयातून सुरू व्हायचे हा फोंडाघाट चा इतिहास आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे हे फोंडाघाट मधील पहिले आमदार व्हावेत ही फोंडाघाट वासीयांची इच्छा आहे अशा शब्दांत भावी आमदार म्हणून संजय आग्रे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. फोंडाघाट महाविद्यालयात आयोजित संजय आग्रे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विधानसभा संघटक संदेश पटेल, शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, युवा सेना तालुकाप्रमुख निलेश तेली, फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी चे सचिव शेखर लिंगरज, खजिनदार आनंद मर्ये, संचालक राजू पटेल, बबन पवार, प्रभारी प्राचार्य डॉ सतीश कामत आदि उपस्थित होते.

error: Content is protected !!