कणकवली पोलिस निरीक्षकांना निवेदन
कणकवली (प्रतिनिधी) : जालना येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्ज चा कणकवली तालुका सकल मराठा समाज कणकवलीच्या वतीने निषेध करण्यात आला. जालना येथील मराठा बांधवांवर झालेल्या लाठी हल्ल्याविरोधात कणकवली पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. या लाठीचार्ज घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला .सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी देखील करण्यात आली. यावेळी सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.














