दत्ता सामंत यांच्या अडीज लाख रुपयांच्या दातृत्वातून मसुरेतील १० वर्षे प्रलंबित ट्रान्सफॉर्मरप्रश्न निकाली

मसुरे (प्रतिनिधी): गेली दहा वर्षे मसुरे गडघेरावाडी दत्त मंदिर येथील प्रलंबित असलेला ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंगचा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांनी पहिल्याच भेटीदरम्यान त्वरित दूर केला आहे. येथील ग्रामस्थांमध्ये त्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे. दत्ता सामंत यांनी स्वतः सुमारे अडीच लाख रुपये खर्च करून वीज वितरण च्या ठेकेदारास येथील ग्रामस्थांचा ट्रान्सफार्मर शिफ्टिंगचा प्रश्न येत्या गणेश चतुर्थी पूर्वी सोडविण्यास सांगितले. गेली दहा वर्षे येथील ग्रामस्थांनी आमदार, खासदार प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही हा प्रश्न सुटत नव्हता. यासाठी येथील ग्रामस्थांच्या वतीने माजी जि प अध्यक्ष सरोज परब,शिवाजी परब, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, महेश बागवे, माजी पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर तसेच स्थानिक ग्रामस्थांनी दत्ता सामंत यांचे लक्ष वेधले होते. यावेळी मसुरे भेटी दरम्यान दत्ता सामंत यांनी या ट्रान्सफार्मर ची पाहणी करून या प्रश्नासाठी लागणारा अडीच लाख रुपयांचा निधी स्वखर्चातून संबंधित ठेकेदारास देऊन हे काम येत्या गणेश चतुर्थी पूर्वी पूर्ण करून देण्याचे सांगितले. एखाद्या देवदूताप्रमाणे दत्ता सामंत यांनी एका शब्दातच येथील वाडीचा गेली कित्येक वर्ष प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडविल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी दत्ता सामंत आणि भारतीय जनता पक्षाचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले.यावेळी स्थानिक ग्रामस्थांच्या समोरच दत्ता सामंत यांनी ठेकेदारास पैसे सुपूर्द केले. संबंधित ठेकेदाराने येत्या काही दिवसात हे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी दत्ता सामंत यांच्यासोबत भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा पदाधिकारी बाळा गोसावी, छोटू ठाकूर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, भाई मांजरेकर, सरोज परब, शिवाजी परब, महेश बागवे, संतोष पालव, जगदीश चव्हाण, प्रमोद बागवे, सुरेश शिंगरे, हिरबा तोंडवळकर, संकेत परब, लक्ष्मण शिंगरे, इशू तोंडवळकर, पुरुषोत्तम शिंगरे, मेस्त्री,तात्या हिंदळेकर, अनंत भोगले, सावंत, शिंगरे, तोंडवळकर आणि स्थानिक ग्रामस्थ व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!