राजकीय हेतूने प्रेरित मोर्चा काढू नये – संजय आग्रे
कणकवली (प्रतिनिधी): जालना लाठीचार्ज चा आम्ही निषेध करत आहोत. एसपी देशी याना सक्तीच्या रजेवर पाठवले असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मराठा आरक्षण बाबत सकारात्मक पाऊल टाकत आहेत. आम्ही मराठा समाजासोबत आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच मुख्यमंत्र्यांची आहे.त्यामुळे मोर्चा काढू नये आवाहन शिवसेनेच्या वतीने करत असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी बोलताना संदेश पटेल म्हणाले की मराठा आरक्षण हे विद्यमान सरकारच देणार आहे.यावेळी शिवसेना जिल्हा खजिनदार भास्कर राणे, विधानसभा संघटक संदेश पटेल, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, उपजिल्हाप्रमुख हरेश पटेल, जिल्हा सचिव किसन मांजरेकर, उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव, प्रशांत वनस्कर आदी उपस्थित होते.












