ज्योती जयवंत पवार यांना सन-२०२३ चा ‘गुरुसेवा गौरव’ पुरस्कार जाहीर

दिपक केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी यांच्या वतीने शिक्षक दिनी ज्योती पवार यांना गौरविण्यात येणार

वैभववाडी (प्रतिनिधी): शालेय शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी यांच्या मार्फत दि .५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून उपक्रमशील व चांगले शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांचा दरवर्षी गौरव केला जातो या वर्षीचा सन -२०२३ चा ‘गुरुसेवा गौरव’ पुरस्कार वैभववाडी तालुक्यातील एडगाव गावच्या, सिंधुदुर्ग जिल्हा परीषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका ज्योती जयवंत पवार एडगाव (पवारवाडी) यांना जाहीर झाला आहे. त्या सद्या विद्या मंदीर शाळा करूळ गावठण येथे कार्यरत असुन , त्यांना महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ देवुन सन्मानित करण्यात येणार आहे . त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!