वरवडे गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी महेश कदम यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी): वरवडे गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी महेश लक्ष्मण कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. वरवडे गावची ग्रामसभा सरपंच करुणा घाडीगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीत तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी महेश कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. महेश कदम यांचे भाजपा उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत, सरपंच करुणा घाडीगांवकर आदींनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. यावेळी उपसरपंच अमोल बोन्द्रे , ग्रामविकास अधिकारी पावसकर, मावळते तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत बोंद्रे, प्रदीप घाडी,प्रमोद गावडे, विशाल कासले,विजय कदम,संतोष कदम,राजू बांदल,प्रनील बांदल,सचिन घाडीगांवकर, बाला मेस्त्री,विशाल वरवडेकर,सिद्धार्थ वरवडेकर ,केतन घाडीगांवकर,इरफान खोत्, सलाउद्दिन कुडाळकर, आजिम कुडाळकर, दशरथ घाडीगांवकर,निलेश सावंत, ग्रामस्थ आणि सोनू सावंत मित्रमंडळ चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!