आयुष्मान भव मोहीम अंतर्गत ९ सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय पेंडुर कट्टा येथे भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन

ओरोस (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय पेंडुर कट्टा येथे आयुष्मान भव मोहीम अंतर्गत शनिवारी ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय पेंडुर कट्टा येथील तज्ञ डॉक्टर उपस्थित राहून रुग्णांना सल्ला देणार आहेत. तसेच यावेळी रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करणार आहेत. याचा लाभ रुग्णांनी, नागरिकांनी घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय पोळ यांनी केले आहे.

error: Content is protected !!