शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज खारेपाटणमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शाळेच्या कै.चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात नुकताच संपन्न झाला.

खारेपाटण शिक्षण संस्थेचे सचिव श्री महेश कोळसुलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य व माजी वित्त व बांधकाम सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार हे उपस्थित होते.खारेपाटण सिनिअर कॉलेज प्राचार्य डॉ.ए डी.कांबळे, हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत व इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमांमध्ये इयत्ता पाचवी ते बारावी या इयत्तेमध्ये मागील वर्षी अनुक्रमे गुणवंत आलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले.यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती रवींद्र उर्फ बाळासाहेब यांनी “खारेपाटण प्रशालेचे विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल तसेच विद्यार्थ्यांचा ओढा खारेपाटण प्रशालेकडे असल्याबद्दल कौतुक केले. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय क्रिकेट संघामध्ये मान मिळवलेला आहे त्या तिन्ही विद्यार्थ्यांची माननीय आमदार नितेश राणे यांच्या क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

या कार्यक्रमांमध्ये आपल्या प्रस्ताविकामध्ये प्राचार्य संजय सानप यांनी प्रशालेचा गौरवशाली इतिहास नमूद केला तसेच विद्यार्थ्यांनी जे यश मिळवले त्याबाबत त्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे अभिनंदन केले.सेक्रेटरी महेशजी कोळसुलकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगता मध्ये सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक शिक्षक महादेव मोटे यांनी केले. तर मान्यवरांचा परिचय सहायक शिक्षक सचिन शेट्ये यांनी केला. तर आभार प्रदर्शन सहायक शिक्षिका प्रियेशा अमृते यांनी केले. या संपूर्ण पारितोषिक वितरण समारंभाची जबाबदारी बक्षीस विभाग प्रमुख महिंद्रे मॅडम व अमृते मॅडम यांनी सांभाळली.

error: Content is protected !!