कार्यशाळेत एकूण वीस विद्यार्थ्यांचा सहभाग
कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे ग्रामपंचायत व अनुभव शिक्षा केंद्र महाराष्ट्र आयोजित रविवार दिनांक 10.09.2023 रोजी 15 ते 30 वयोगटातील मुला मुलींच एक दिवसीय कार्यशाळा च आयोजन केलं होत.ह्या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये अनुभव शिक्षण केंद्राची माहिती,लीडर शिप कशी करावी,टीम वर्क कसं असावं,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,उत्कृष्ट वक्ता कसा असावा,व्यक्ती महत्व कसं असावं, एक यशस्वी उद्योजक कसा असावा,संविधानाची निर्मिती ,संविधानाची मूलभूत गरज,संविधानाचा जागर,स्त्री पुरुष समानता,ह्या विषयी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन उच्च दर्ज्याच्या मार्गदर्शक यांच्याकडून देण्यात आले.एकदिवसीय कार्यशाळेमध्ये एकूण 20 मुला मुलींनी सहभाग दर्शविला होता.मार्गदर्शक म्हणून अनुभव शिक्षा केंद्र समन्वयक सहदेव पाटकर,अनुभव साथी विशाल गुरव, व सुजय जाधव हे मार्गदर्शक लाभले त्यांचे ग्रामपंचायत कडून स्वागत करण्यात आले.
सरपंच सुशिल कदम आपल्या मनोगत व्यक्त करताना अनुभव शिक्षा केंद्र महाराष्ट्र यांचे आभार व्यक्त केले.आजच्या कार्यशाळेचा मुलांना नीच्छित लाभ होईल.मुलानं कडून सुध्दा चांगला प्रतिसाद लाभल्या मुळे पुढे अशाच प्रकारचं काम आपल्या हाताने घडेल अशी आशावाद व्यक्त केली.स्पर्धा परीक्षा न्हा सामोरं जाण्यासाठी सरपंच सुशिल कदम यांनी मुलांना आव्हान केलं त्या साठी आपण प्रामाणिक पने प्रयत्न करणार अशी ग्वाही सुध्दा दिली.सर्व मार्गदर्शक यांचं मुलाचं उपस्थित सर्वांचं सरपंच सुशिल कदम यांनी आभार व्यक्त केले.
एक दिवसीय कार्यशाळेला सरपंच सुशिल कदम,उपसरपंच शुभावली सावंत,माजी सरपंच व नूतन तंटा मुक्त अध्यक्ष सुधीर सावंत,ग्रामपंचायत सदस्य नेहा घाडी गावकर,संजय परब,सूनीलदत्त जाधव,माजी उपसरपंच संदेश सावंत,अभय सावंत,मार्गदर्शक.सहदेव पाटकर,विशाल गुरव,सुजय जाधव व गावातील नागरिक,प्रशिक्षणार्थी मूल मुली उपस्थित होते.




















