शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश ; केबिनमध्ये फोटो उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे

निष्ठा ठाकरेंशी की शिंदेशी ? देवगड जामसंडे शहरात एकच चर्चा

देवगड (प्रतिनिधी) : देवगड जामसंडे नगरपंचायत च्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी अलीकडेच मुंबईत मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. परंतु अद्यापही नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या नगरपंचायत मधील दालनात नगराध्यक्ष खुर्चीमागे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंसोबत शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना उबाठा प्रमुख आदित्य ठाकरे यांचेच फोटो भिंतीवर आहेत. शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर नगराध्यक्ष दालनात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत धर्मवीर आनंद दिघे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लावणे हे संयुक्तिक आहे. मात्र एकीकडे शहर विकासासाठी शिंदे शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करणाऱ्या नगराध्यक्षा प्रभू आपल्या नगराध्यक्ष दालनातील पूर्वाश्रमीचे नेते उद्धव आणि आदित्य यांचे फोटो मात्र काढायला अजूनही बघत नाहींयत. म्हणजे नेमकं प्रभू यांची निष्ठा शिंदेंसोबत आहे की ठाकरेंसोबत ? असा तर्कवीतर्क देवगड जामसंडे शहरातील जनता लढवत आहे.या घटनेवरून देवगड जामसंडे शहरातील नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा शहरातील नाक्यानाक्यावर रंगत आहे. उबाठा सेनेतून केलेला शिंदे सेनेतील प्रवेश च्या मागे नेमकं गुपित काय ? हा पक्षप्रवेश खरेच शहर विकासासाठी होता की अन्य काही कारणांसाठी होता ? तसे असेल तर ती अन्य कारणे कोणती असतील याच्या शक्यता देवगड जामसंडे शहरवासीय आपापसांत चर्चेत रंगवताना दिसत आहेत.

error: Content is protected !!