अवैध वाळू उत्खनन वाहतूक प्रकरणी सावंतवाडी तहसीलदार, बांदा,माडखोल मंडळ अधिकारी यांचे निलंबन करा

सावंतवाडीतील सुमेध गावडे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूठमाती आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सावंतवाडी, दानोली, माडखोल, ओटवणे नदीपात्रातील गाळाच्या नावावर अवैध वाळू उत्खनन करण्यात आले असून या वाळूची वाहतूक देखील सावंतवाडी तहसीलदार आणि महसूल यंत्रणेच्या डोळ्यादेखत झाली आहे. याबाबत चौकशी ची मागणी केल्यानंतर बांदा, माडखोल मंडळ अधिकारी यांना अहवाल देण्याचे आदेश देऊनही ६२ दिवसाचा कालावधी झाला तरी अहवाल देण्यात आलेला नाही. अहवाल देण्यास एवढा कालावधी का लागतो? कोण त्यांना पाठीमागे घालत आहे? हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे अवैध वाळू उत्खनन वाहतूक प्रकरणी सावंतवाडी तहसीलदार, बांदा, माडखोल मंडळ अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करून यांची सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी सावंतवाडी तालुक्यातील सुमेध सुरेश गावडे याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूठमाती आंदोलन छेडले.

सावंतवाडी तालुक्यातील सावंतवाडी, दानोली, माडखोल, ओटवणे नदीपात्रातील गाळाच्या नावावर अवैध वाळू उत्खनन करण्यात आले. या वाळूची वाहतूक तहसीलदार आणि महसूल यंत्रणेच्या डोळ्यादेखत करण्यात आली असे असताना देखील या प्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. अवैध वाळू उत्खनन प्रकरणी सुमेध गावडे यांनी २५ मे २०२३ रोजी उपोषण केल्यावर या प्रकरणी बांदा व माडखोल मंडळ अधिकाऱ्यांना या प्रकरणी अहवाल देण्याचे आदेश दिले. हे आदेश देऊन आता ६२ दिवसाचा कालावधी पूर्ण झाला मात्र अद्याप त्या मंडळ अधिकाऱ्यांनी अहवाल दिलेला नाही. एखादा वरिष्ठ अधिकारी अहवाल देण्याचे आदेश देऊनही कर्मचारी अहवाल देत नाहीत आणि संबधित अधिकारी शांत राहतो हे शक्य कसे काय असू शकते असे सांगत या प्रकरण तहसीलदार यांचाही सहभाग असल्याचा आरोप गावडे यांनी केला आहे. सावंतवाडी तहसीलदार आणि बांदा माडखोल मंडळ अधिकारी यांच्या वरदहस्तामुळे ही वाळू वाहतूक झाली आहे. त्यामुळे अवैध वाळू उत्खनन वाहतूक प्रकरणी सावंतवाडी तहसीलदार, बांदा, माडखोल मंडळ अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करून यांची सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी सावंतवाडी तालुक्यातील सुमेध सुरेश गावडे याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूठमाती आंदोलन छेडले.

error: Content is protected !!