राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्याकडून श्रावणी सोमवार निमित्त कुणकेश्वर, धोपेश्वर दर्शन साठी वाहतूक व्यवस्था

भाविक महिला भगिनींनी मानले आभार

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी 11सप्टेंबर रोजी श्रावण सोमवार निमित्त कणकवली शहरातील शिवाजीनगर जळकेवाड़ी व इतर भागातील महिला भगिनीना दरवर्षी प्रमाणे कोकणची काशी श्री देव कुणकेश्वर व राजापुर येथील श्री देव धोपेश्वर या देव दर्शनासाठी वाहतूक व्यवस्था स्वखर्चाने केली. अबिद नाईक हे गेली अनेक वर्ष कणकवलीतील महिला भगिनिना श्रावण महिन्यात श्रावण सोमवार निमित्त श्री देव कुणकेश्वर येथे देवदर्शन ची व्यवस्था करत असतात. त्याच प्रमाणे यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी देवदर्शनाची महिला भगिनींची व्यवस्था केली. 11 सप्टेंबर हा श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने या दिवशी भाविक कोकण काशी श्री देव कुणकेश्वर दर्शनाला आवर्जून जातात.त्यातच अबिद नाईक यांनी वाहतूक तसेच अन्य व्यवस्था केल्यामुळे भाविक महिला भगिनींना देवदर्शना चा लाभ घेता आला. अबिद नाईक यांच्या या धार्मिक उपक्रमाबद्दल महिला भगिनीनी अबिद नाईक यांचे आभार व्यक्त केले. आज देवदर्शनाला गेलेल्या सर्व भाविक महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद यातच माझे समाधान असून दरवर्षी या देवदर्शनाचे माझ्याकडून सातत्य राहिल असे अबिद नाईक यांनी आपल्या सर्व महिलाभगिनी यांना आश्वाशीत केले.

error: Content is protected !!