सातार्डा बिट हवालदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करा

न्हावेली पार्सेकरवाडीतील सुंदर पार्सेकर यांचे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : खाकीवर्दीचा आणि बळाचा वापर करून आपला टेम्पो तब्बल १९ महिने सावंतवाडी पोलिस ठाणे हद्दीत ठेवून आपल्या साडेतेरा लाखांच्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत असणाऱ्या सावंतवाडी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलीस अधिकारी आणि सातार्डा बिटचे हवालदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, त्यांच्या मालमत्तेतून आपली झालेल्या साडेतेरा लाखांची आर्थिक नुकसानी वसूल करावी. या मागणीसाठी सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली पार्सेकरवाडी येथील सुंदर बाबुराव पार्सेकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आज पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

आपला टेम्पो न्हावेली येथे रस्त्याच्या कडेला उभा होता. यावेळी २० जानेवारी २०२२ रोजी दोन युवक सवार असलेली होंडा शाईन दुचाकीने मागून धडक दिली. यात आपल्या टेम्पो सह दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले होते. यावेळी दुचाकी स्वार तरुणांच्या सांगण्यावरून आणि राजकीय दबावापोटी सावंतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी आपला टेम्पो व दुचाकी पोलिस ठाण्यात नेली होती. यावेळी आपला टेम्पो जप्त करून पोलिस ठाण्यात ठेवण्यात आला. मात्र दुचाकी कोणत्या आधारे सोडण्यात आली याचे उत्तर पोलिसांकडे नसल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. दरम्यान आपल्याला आपला टेम्पो मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू असतानाच सहा महिन्यांनी तत्कालीन सहाय्यक पोलिस अधिकाऱ्यांनी सुडाचे राजकारण करून २३ जून २०२२ रोजी आपल्याच विरोधात खोटा गुन्हा दाखल केला. मात्र हा गुन्हा अद्याप न्यायालयात सादर करण्यात आलेला नाही. असेही पार्सेकर यांनी यावेळी सांगितले.
मात्र घटना घडून आता तब्बल १९ महिन्यांचा कालावधी झाला तरी आपला टेम्पो सावंतवाडी पोलिस ठाणे हद्दीत ठेवण्यात आला. या कालावधीत टेम्पोची देखरेख नीट न झाल्याने टेम्पो सडण्याच्या स्थितीत आला आहे. हा टेम्पो आता चालविणे शक्य नाही. त्यामुळे वर्दीचा धाक दाखवून सावंतवाडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन अधिकारी आणि सातार्डा बीट हवालदार यांनी तब्बल १९ महिने टेम्पो पोलिस ठाण्यात ठेवून आपले साडेतेरा लाखांची आर्थिक नुकसानी केली आहे. त्यामुळे आपल्या साडेतेरा लाखांच्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत असणाऱ्या सावंतवाडी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलीस अधिकारी आणि सातार्डा बिटचे हवालदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्या मालमत्तेतून आपली झालेल्या साडेतेरा लाखांची आर्थिक नुकसानी वसूल करावी या मागणीसाठी सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली पार्सेकरवाडी येथील सुंदर बाबुराव पार्सेकर यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

error: Content is protected !!