अवैध दारू वाहतुकीसाठी आलिशान टाटा सफारी !

3 लाख 70 हजारांच्या गोवा बनावटीच्या दारुसह 11 लाख 69 हजरांचा मुद्देमाल जप्त

एलसीबी सिंधुदुर्ग च्या पथकाची ओसरगाव येथे कारवाई

कणकवली (प्रतिनिधी) : गणेश चतुर्थीसणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग एलसीबी ने गोवा बनावटीच्या दारू तस्करीवर करडी नजर ठेवली असून 1 1सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी नॅशनल हायवेवर ओसरगाव टोलनाका येथे आलिशान टाटा सफारी कारमधून गोवा बनावटीची दारू तस्करी करताना दोघांना रंगेहाथ पकडले आहे. स्वप्निल उर्फ मुन्ना भिमराव वसेकर, वय 25 रा. टाकळी सिकंदर, उजनी कॉलनी, ता.-मोहोळ जिल्हा-सोलापूर आणि शहाजी पठाण गायकवाड, वय-21, रा. टाकळी सिकंदर, भीमा सहकारी साखर कारखान्याजवळ, ता.मोहोळ जिल्हा-सोलापूर अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून 8 लाख रुपये किंमतीची टाटा सफारी कारसह 3 लाख 69 हजार 600 रुपयांची अवैध दारू असा एकूण 11 लाख 69 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.एसपी अग्रवाल, अतिरिक्त एसपी बगाटे, एलसीबी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण साळुंके, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र जामसंडेकर, आशिष गंगावणे, प्रमोद काळसेकर, बसत्याव डिसोझा, पोलीस नाईक आशिष जामदार, अमित तेली व पोलीस कॉन्स्टेबल यशवंत आरमारकर यांनी ही कारवाई केली आहे.आरोपी विरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (अ)(इ), 81,83 व मोटर वाहन कायदा कलम 3(1)/181, 139/177 अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे.

error: Content is protected !!