27 रक्तदात्यांनी नोंदवला रक्तदान शिबिरामध्ये सहभाग
वैभववाडी (प्रतिनिधी): स्वर्गीय भरत म्हाळू बोडेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाबद्दल नापणे येथे स्वर्गीय भरत बोडेकर युवा प्रतिष्ठान व सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 27 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला होता.
यावेळी माजी जिल्हा बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, अर्जुन रावराणे विद्यालयाचे प्राचार्य नादकर, नापणे सरपंच प्रदिप जैतापकर, उपसरपंच जयप्रकाश यादव, चेअरमन विनोद जठार, बुथ अध्यक्ष जयवंत जैतापकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी अध्यक्ष राजेश पडवळ, भरत बोडेकर प्रतिष्ठान अध्यक्ष चंद्रकांत बोडेकर, उपाध्यक्ष रुपेश कोकरे, सचिव अनिल कोकरे, सल्लागार विजय कोकरे, खजिनदार सुरेश काळे, सदस्य विलास फाले, बाळु बोडेकर याबरोबरच विजय खाडे, प्रकाश यादव, बबन शेळके, धनाजी हुंबे, प्रशांत ढवण, संजय गुरखे, कमलाकर कोकरे, नारायण जैतापकर, निलेश शेळके, विशाल शेळके, गंगाराम कोकरे, प्रकाश कोकरे, विनय कोकरे, नितेश कोकरे, संजय बोडेकर, अशोक शिंदे, लक्ष्मण बोडेकर आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. रक्तदान शिबिरासाठी पडवे ब्लड बँक चे सहकार्य लाभले.













