9 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत केवळ 999 रुपयांत होणार उपचार
कणकवली (प्रतिनिधी) : माधवबागच्या वतीने खास थायरॉईड तपासणी व पंचकर्म शिबिराचे दि. ९ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत माधवबागचा कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या केंद्रांवर आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत हे शिबीर संपन्न होणार असून केवळ ९९९ रुपयांत ही उपचार पद्धती रुग्णांना उपलब्ध होणार आहे. हृदयाचे ठोके वाढणे, अति प्रमाणात वजन वाढ, वजन कमी होणे, थकवा, कोरडी त्वचा, अतिप्रमाणात घाम, मासिक पाळीमध्ये अनियमितता, गळ्याच्या खालच्या बाजूला सूज, केस गळणे यासारखी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना येथील उपचाराचा फायदा होणार आहे. थायरॉईड उपचारांमुळे TSH, TE, T4 या थायरॉईड हार्मोनचे प्रमाण योग्य पातळीवर राखले जाते. थायरॉईड ग्रंथींचे सर्व कार्य सुधारते आणि थायरॉईडच्या त्रासाने होणाऱ्या हृदय रोगाची शक्यता कमी होऊन हृदय सशक्त होते. त्यामुळे या तपासणी आणि पंचकर्म शिबिराचा लाभ गरजूंनी घ्यावा, असे आवाहन माधवबागच्या वतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी कणकवली 9373183888, कुडाळ 9011328581 आणि सावंतवाडी 7774028185 या नंबरवर संपर्क साधावा.












