बाबू गवस यांची थायलंड येथील अभ्यास दौ-यासाठी निवड

सावंतवाडी (प्रतिनिधी) : गेली सहा वर्षे सिंधुदुर्ग, गोवा व कर्नाटक येथे विषमुक्त शेती अभियान राबवून त्या अंतर्गत सेंद्रिय शेतीचा प्रसार व प्रचार करणार्‍या दोडामार्ग तालुक्यातील उसप येथील लक्ष्मी कृपा एंटरप्रायझेसच्या बाबू गवस यांच्या कार्याची दखल वेस्टिज मार्केटिंग कंपनीने घेत त्यांची थायलंड अभ्यास दौ-यासाठी निवड केली आहे.

त्यांच्या या कार्याची दखल घेवून वेस्टिज मार्केटिंग कंपनीनेशेतक-यांचा एकरी उत्पादन खर्च कमी करुन उत्पन्न वाढविण्यासाठी व निरोगी जीवन जगण्यासाठी सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. लक्ष्मी कृपा एंटरप्रायझेसचे गुणाजी गवस उर्फ बाबू गवस गेली सहा वर्षे सिंधुदुर्ग, गोवा व कर्नाटक येथे विषमुक्त शेती अभियान राबवत असून त्या अंतर्गत सेंद्रिय शेतीचा प्रसार व प्रचार करीत आहेत. सेंद्रिय शेतीच्या प्रचारासाठी गावागावात शेतक-यांचे मेळावे व बैठका घेवून प्रबोधन करत आहेत. सिंधुकृषी मेळाव्या मध्ये स्टॉल लावून शेतक-यांमध्ये जागृती करत आहेत

त्यांच्या या कार्याची दखल घेवून वेस्टिज मार्केटिंग कंपनीने गुणाजी गवस उर्फ बाबू गवस यांची थायलंड अभ्यास दौ-यासाठी निवड केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून शेतक-यांचे राहणीमान सुधारण्यासाठी अभ्यासदौरा फायदेशीर ठरेल असे बाबू गवस यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!