खारेपाटणमध्ये शिवसेनेच्या वतीने चाकरमानी गणेश भक्तांच्या स्वागतासाठी मोफत चहापान व्यवस्था

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण चेक पोस्ट येथे शिवसेना नेते किरण उर्फ भैया सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली खारेपाटण विभाग शिवसेनेच्या वतीने मुंबई वरून कोकणात येणाऱ्या चाकरमानी गणेश भक्तासाठी उभारण्यात आलेल्या मोफत चहापान स्वागत कक्षाचे उद्घघाटन आज शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे व कणकवली पोलीस उपनिरीक्षक शरद देठे यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव,खजिनदार भास्कर राणे, लियाकत काझी,खारेपाटण ग्रा.पं.सदस्य गुरूप्रसाद शिंदे,सुधाकर ढेकणे, अस्ताली पवार, मंगेश ब्रम्हदंडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुहास राऊत,केळवली शिवसेना विभाग प्रमुख तनावडे, परवेज पटेल,शमशुद्दिन काझी,पोलीस कॉन्स्टेबल मारुती बराड,पराग मोहिते,ट्रॅफिक पोलीस प्रशांत धुमाळे,अमोल काळे तसेच शिवसेना कार्यकर्ते नंदिनी पराडकर,देवानंद ईसवलकर, आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण येथे कोकणात येणाऱ्या सर्व गणेश भक्तांचे संजय आंग्रे यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तर मुबईकर चाकरमानी तथा गणेश भक्तांना सुरक्षित घेऊन येणाऱ्या एस टी चालक वाहक यांचे देखील मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी खाजगी वाहने तसेच एस टी बसने व रेल्वेने येणाऱ्या गणेश भक्तांना खारेपाटण येथे शिवसेना पक्षाच्या वतीने मोफत चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे गणेश भक्तांच्या वतीने आयोजकांचे आभार मानण्यात आले. दरम्यान या कार्यक्रमासाठी उपस्थित जिल्हा प्रमुख संजय आंग्रे कणकवली पोलीस निरीक्षक शरद देठे यांचा खारेपाटण शिवसेना विभागाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी मानले.

error: Content is protected !!