जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे

णेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य पथक तैनात

खारेपाटण (प्रतिनिधी): गौरी – गणपती सणाच्या पार्श्भूमीवर मुंबई वरून कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांसाठी मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण टाकेवाडी येथे जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्य पथक तैनात करण्यात आले असून मुंबईकर चाकरमानी तथा गणेश भक्तांच्या सेवेसाठी शुक्रवार दी.१५ सप्टेंबर २०२३ पासून ते सज्ज झाले आहे. खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रिया वडाम यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या या आरोग्य पथकामध्ये आरोग्य सहाय्यक तथा सुपरवायजर प्रवीण भगवत,एस एस मांडवकर, श्रीम.मजिरी बावकर,श्रीम.वैश्र्नवी घुगरदरे,एन एस जाधव,गणेश तेली, आर जी नायकोजी,प्रणव पाटील, श्रीम. प्रणाली बाणे,श्रीम.दिपाली दुखंडे,श्रीम लक्ष्मी करोड,तसेच अशा स्वयंसेविका गतप्रवर्टक श्रीम संकिता पाटणकर या खारेपाटण प्रा.आ. केंद्राच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असून कासार्डे प्रा.आ.केंद्राचे डॉ.धनश्री जाधव,श्रीम.सुचिता तळेकर तर वरवडे प्रा.आ.केंद्राच्या श्रीम.उत्प्रेक्षा गुरव व खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एकूण आशा स्वयंसेवीकांचा या आरोग्य पथकामध्ये समावेश आहे. सदर आरोग्य पथक दि.१५ सप्टेंबर २०२३ ते दि.२५ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुंबई वरून जिल्ह्यात येणाऱ्या गणेश भक्तांसाठी कार्यरत राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

error: Content is protected !!