जिल्हास्तरीय शालेय वूशू स्पर्धेत कासार्डे विद्यालय व देवगड कॉलेजचे वर्चस्व

जिल्हास्तरीय शालेय वूशू स्पर्धेचा निकाल जाहीर..

तळेरे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ओरोस येथील क्रीडा संकुलात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय वूशू स्पर्धेत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे व न.शा.पंत वालावलकर कॉलेज देवगड या दोन्ही शाळांनी प्रत्येकी १३ गटांचे विजेतेपद पटकावून वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

दरम्यान या स्पर्धेचे उद्घाटन तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे,शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बयाजी बुराण,राज्य समन्वयक व पंच दत्तात्रय मारकड,पंच प्रा.शहाजी गोफणे, बाळासाहेब ढेरे,श्री.दळवी,नागेश बांदेकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय खेळाडूच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.या स्पर्धेला पंच म्हणून शहाजी गोफणे,दत्तात्रय मारकड, बाळासाहेब ढेरे व नागेश बांदेकर आदींनी उत्तम कामगिरी पार पाडली.

जिल्हास्तरीय वूशू स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-१७ वर्षाखालील मुलांमध्ये –
४० कि.ग्रॅ.खालील वजन गटात- दुर्गेश नानेरकर- (कुणकेश्वर हायस्कूल) -प्रथम,
४५कि.ग्रॅ.खालील वजन गटात-विश्वास चव्हाण (कासार्डे हायस्कूल)- प्रथम, स्वराज चव्हाण (कुणकेश्वर हायस्कूल ) द्वितीय,
४८कि.ग्रॅ.खालील वजन गटात-सुजल नानेरकर (कुणकेश्वर हायस्कूल) प्रथम, सोहम लिंगायत (कासार्डे हायस्कूल) द्वितीय,
५२कि.ग्रॅ.खालील वजन गटात-सुशील नानिरकर (कुणकेश्वर हायस्कूल )-प्रथम,
५६कि.ग्रॅ.खालील वजन गटात-दर्शन साईंम (कुणकेश्वर हायस्कूल)- प्रथम
६०कि.ग्रॅ.खालील वजन गटात-तनिष घाडी (कुणकेश्वर हायस्कूल)- प्रथम,
७०कि.ग्रॅ.खालील वजन गटात-किशोर बाबूलाल देवासी (कासार्डे हायस्कूल)- प्रथम,
७५कि.ग्रॅ.खालील वजन गटात-विघ्नेश पेडणेकर (कासार्डे हायस्कूल) -प्रथम
८५ कि.ग्रॅ.वरील वजन गटात-आराध्य तळेकर (कासार्डे हायस्कूल) – प्रथम,
१७ वर्षाखालील मुलींमध्ये –
३६कि.ग्रॅ.खालील वजन गटात-दुर्वा पाटील -प्रथम व सना शेख – द्वितीय (दोन्ही कासार्डे हायस्कूल)
४०कि.ग्रॅ.खालील वजन गटात-रिद्धी परब (कासार्डे हायस्कूल)- प्रथम, रिया नाणेरकर (कुणकेश्वर हायस्कूल) -द्वितीय, सावनी शेट्ये (कासार्डे हायस्कूल)- तृतीय
४५कि.ग्रॅ.खालील वजन गटात-दीक्षा सुथार (कासार्डे हायस्कुल)प्रथम,साक्षी सरवणकर (कासार्डे हायस्कूल) द्वितीय भैरवी घाडी ( कुणकेश्वर हायस्कूल)- तृतीय
४८कि.ग्रॅ.खालील वजन गटात-अनुष्का जाधव- प्रथम, विधी चव्हाण -द्वितीय( दोघीही कासार्डे हायस्कूल),रिया नाणेरकर (कुणकेश्वर हायस्कूल)- तृतीय
५२कि.ग्रॅ.खालील वजन गटात-तेजस्वी कदम (कुणकेश्वर हायस्कूल) प्रथम, नंदिता मत्तलवार (कासार्डे हायस्कूल द्वितीय),
५६ कि.ग्रॅ.खालील वजन गटात-आसावरी तानवडे (कासार्डे हायस्कूल)- प्रथम, अनुष्का चव्हाण (कुणकेश्वर हायस्कूल) द्वितीय,
६०कि.ग्रॅ.खालील वजन गटात-पूर्वा चव्हाण (कुणकेश्वर हायस्कूल) प्रथम, ७० कि.ग्रॅ.वरील वजन गटात-मंथली मुणगेकर) कासार्डे हायस्कूल) -प्रथम,
१९ वर्षाखालील मुलांमध्ये –
४०कि.ग्रॅ.खालील वजन गटात-वृशांत बवीसा (देवगड कॉलेज)-प्रथम,४५कि.ग्रॅ.खालील वजन गटात-पार्थ पाटील ( कासार्डे कॉलेज) – प्रथम,
५२कि.ग्रॅ.खालील वजन गटात-विघ्नेश धुरी -प्रथम, अभिषेक इप्परकर – द्वितीय ( दोघेही देवगड कॉलेज),
५६कि.ग्रॅ.खालील वजन गटात-दिपक जाधव (कासार्डे कॉलेज) – प्रथम, श्रीकांत राणे ( देवगड कॉलेज,) द्वितीय,
६०कि.ग्रॅ.खालील वजन गटात-सुशांत नाणेरकर ( देवगड कॉलेज) प्रथम,
६५कि.ग्रॅ.खालील वजन गटात-स्वयंम शेगडे-प्रथम, ७०कि.ग्रॅ.खालील वजन गटात-गणेश तावडे-प्रथम, ८०कि.ग्रॅ.खालील वजन गटात-तोफिक शेख-प्रथम ८५कि.ग्रॅ.खालील वजन गटात-अमित माळवदे- प्रथम (सर्व देवगड कॉलेज)
१९ वर्षाखालील मुलींमध्ये –
३६कि.ग्रॅ.खालील वजन गटात-रिद्धी राणे -प्रथम आकांक्षा आडिवरेकर (दोघीही कासार्डे हायस्कूल)
४०कि.ग्रॅ.खालील वजन गटात-आरती गावडे (देवगड कॉलेज) -प्रथम, ऋतुजा शिंदे (कासार्डे हायस्कूल)- द्वितीय,
४५कि.ग्रॅ.खालील वजन गटात-मधुरा घाडी (देवगड कॉलेज) प्रथम, भक्ति लाड ,(कासार्डे हायस्कूल) द्वितीय
४८ कि.ग्रॅ.खालील वजन गटात-पायल सनये ,) देवगड कॉलेज)-प्रथम, कार्तिकी ताम्हणकर ( कासार्डे हायस्कूल) द्वितीय,
५२ कि.ग्रॅ.खालील वजन गटात-साक्षी तेली कासार्डे हायस्कूल)-प्रथम, मृणाल सावंत-( कासार्डे हायस्कूल)-द्वितीय,( सानिका खोत देवगड कॉलेज) तृतीय
५६कि.ग्रॅ.खालील वजन गटात-सोनल कोकम (देवगड कॉलेज)- प्रथम
६० कि.ग्रॅ.खालील वजन गटात-कलिका ठुकरूल ,(देवगड कॉलेज) प्रथम,
६५कि.ग्रॅ.खालील वजन गटात-कृतिका सावंत ( देवगड कॉलेज ,)-प्रथम,
७०कि.ग्रॅ.खालील वजन गटात-दिक्षा परब ( देवगड कॉलेज) -प्रथम आली आहे.
या यशस्वी खेळाडूमधून प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडुंची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सर्व यशस्वी खेळाडूंचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम. विद्या शिरस, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांच्यासह पंचांनी अभिनंदन करून कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!