महिला दिनानिमित्त ओसरगावात पाककला व ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धा

सरपंच सुप्रिया कदम यांचा पुढाकार

कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त ओसरगावच्या सरपंच सुप्रिया संतोष कदम यांच्या पुढाकारातून महिलांसाठी खास पाककला व “खेळ पैठणीचा” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दि. ८ मार्च २०२६ रोजी दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत जि.प. ओसरगाव कानसळी शाळा येथे पार पडणार आहे.

महिलांच्या कला, कौशल्य आणि उत्साहाला व्यासपीठ मिळावे तसेच महिला दिन आनंदात साजरा व्हावा या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पाककलेत महिलांना आपल्या खास रेसिपी सादर करण्याची संधी मिळणार असून “खेळ पैठणीचा” या स्पर्धेमुळे कार्यक्रमात रंगत येणार आहे.

या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी ओसरगाव व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घ्यावा, असे आवाहन सरपंच सुप्रिया संतोष कदम यांनी केले आहे.

error: Content is protected !!