खासदार नारायण राणेंची जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे ,पं स सदस्य सिद्धेश रावराणेंनी घेतली सदिच्छा भेट

पं स सदस्य देवानंद पालांडे, सोसायटी चेअरमन जयसिंग रावराणे होते उपस्थित

वैभववाडी (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे तसेच लोरे नं 2 चे नूतन पं स सदस्य सिद्धेश दिलीप रावराणे यांनी पडवे येथे सदिच्छा भेट घेतली. खासदार नारायण राणे अलीकडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईत वैद्यकीय उपचार घेत होते. खासदार नारायण राणे यांचे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकालानंतर प्रथमच सिंधुदुर्गात आगमन झाले. या पार्श्वभूमीवर दिलीप रावराणे , सिद्धेश रावराणे यांनी खा. राणेंची सदिच्छा भेट घेत त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. सिद्धेश रावराणे यांनी प्रथमच निवडणूक लढवून मोठा विजय मिळवला आहे. यानिमित्ताने सिद्धेश यांनी खासदार राणे यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी भुईबावडा मतदारसंघाचे नूतन पं स सदस्य देवानंद पालांडे, आचिर्णे सोसायटी चेअरमन तथा माजी सरपंच जयसिंग रावराणे उपस्थित होते.

error: Content is protected !!