कणकवली येथील पत्रकारांनी खा.नारायण राणेंची घेतली सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी कणकवलीतील पत्रकारांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी खा. राणे यांच्या तब्बेतीची विचारपूस करत पत्रकारांनी विविध विषयांवर चर्चा करत संवाद साधला.

यावेळी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष वायंगणकर, गणेश जेठे,जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ, जिल्हा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत भावे, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, माजी तालुकाध्यक्ष अजित सावंत, नितीन सावंत, सुधीर राणे, राजन चव्हाण, संतोष पाटणकर, उमेश बुचडे, स्वप्नील वरवडेकर, तुषार हजारे, प्रथमेश जाधव आदी उपस्थित होते.यावेळी शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, डॉ. मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते.

error: Content is protected !!