जि.प. सदस्य संदेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला म्हत्वाचा निर्णय
कणकवली (प्रतिनिधी) : सांगवे ग्रामपंचायत वतीने गुरुवार दिनांक 5 मार्च रोजी सांगवे–कनेडी बाजारपेठेतील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस माजी जि. प. अध्यक्ष तथा विद्यमान जि. प. सदस्य संदेश उर्फ गोटया सावंत यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली.
दशक्रोशीची मुख्य बाजारपेठ असलेल्या सांगवे–कनेडी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून अरुंद रस्त्यांमुळे वाहनधारक, व्यापारी व ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बाजारपेठ रुंदीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला
.सदर प्रस्तावास सर्व व्यापारी व जमीनधारक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्वानुमते संमती दर्शवली. तसेच रिक्षा व्यावसायिकांसाठी नियोजित पद्धतीने रिक्षा उभ्या करण्याचे नियोजन ठरविण्यात आले.
या कामासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन संदेश उर्फ गोटया सावंत यांनी दिले. बैठकीत सर्व संबंधित घटकांनी खेळीमेळीत व सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा करून विकासाच्या दिशेने एकमत दर्शविले .
या बैठकीस संजय घुराजी सावंत (सरपंच), अभिजीत नंदकुमार काणेकर (उपसरपंच),विजय दिगंबर भोगटे (विभागीय अध्यक्ष),प्रदीप विठ्ठल सावंत (तंटामुक्ती अध्यक्ष), भालचंद्र गोविंद सावंत (चेअरमन),शशिकांत नारायण कुबडे (व्यापारी संघटना अध्यक्ष),वेंगुर्लेकर (बीट अंमलदार), तसेच व्यापारी वर्गातील उदय सावंत,जयवंत सावंत,चंद्रशेखर वाळके, आबा पांगम, कि्तीराज सावंत व रिक्षा चालक, व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगवे–कनेडी बाजारपेठेच्या सुयोग्य नियोजनासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.












