विनोद तावडे यांच्या राज्यसभा उमेदवारीनिमित्त प्रमोद जठार यांची सदिच्छा भेट

मुंबई (प्रतिनिधी) : भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज माजी आमदार प्रमोद जठार यांनी विनोद तावडे यांची भेट घेतली. भेटीदरम्यान संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा पुस्तक भेट दिले. कालच भारतीय जनता पक्ष केंद्रातून कोकण सुपुत्र महाराष्ट्राचे माजी मंत्री राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच संपूर्ण राज्यात व विशेष करून कोकणात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यातच कणकवली विधानसभेचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी तावडे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि हिंदू धर्म रक्षक मराठा योद्धा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हे पुस्तक भेट दिले. या भेटीदरम्यान जठार यांनी विनोद तावडे यांना आपण लवकरच मंत्री होऊन कोकणात यावे आणि कोकणातील विकासाचा बॅकलॉग भरून काढावा अशी विनंती देखील करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर व उद्योजक सुनील खाडे उपस्थित होते.

error: Content is protected !!