देवगड (प्रतिनिधी) : आजारी असल्यामुळे उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आलेले देवगड पं.स.मधील ग्रामसेवक दत्तात्रय बापू कांबळे(५२) यांचे निधन झाले.कांबळे यांच्या प्लेटलेट कमी झाल्या होत्या व त्यांना चक्कर आल्याने उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.ही घटना शनिवारी रात्री ८.३० वा.सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दत्तात्रय कांबळे हे देवगड पं.स.मध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते.सुरूवातीला ते मणचे व मुटाट ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते त्यानंतर तक्रारीअंती त्यांना राखीव ग्रामसेवक म्हणून देवगड पं.स.मध्ये नियुक्ती देण्यात आली होती.देवगड हायस्कुलच्या मागे असलेल्या दिलीप मुणगेकर यांच्या चाळीमध्ये ते भाड्याने राहत होते. त्यांचे मुळ गाव सांगरूळ ता.करवीर जि.कोल्हापूर असून पत्नी व मुले गावी गेल्यामुळे ते खोलीत एकटेच राहत होते. शुक्रवारी ते आजारी असल्याने व प्लेटलेट कमी होवून चक्कर येवून पडल्याने त्यांना मुणगेकर यांनी उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले मात्र उपचारापुर्वीच डॉक्टरांनी मयत झाल्याचे जाहीर केले.या घटनेची त्यांची पत्नी ज्योती दत्तात्रय कांबळे यांनी देवगड पोलिस स्थानकात खबर दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.तपास पो.हे.कॉ.राजन जाधव करीत आहेत.