विजयदुर्ग येथील सुनसान जागेतील बसस्टाँप मधे राहत असलेली निराधार मनोरूग्ण महिला संविता आश्रमात दाखल

संविता आश्रमचे संदिप परब आणि कार्यकर्त्यांची माणूसकीपूर्ण कामगीरी

हाडामासाच्या जीवंत माणूस असलेल्या देवी दुर्गेचीच जणू कार्यकर्त्यांनी केली संविता आश्रमात प्रतिष्ठापना

खारेपाटण (प्रतिनिधी): जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदिप परब आणि त्यांच्या सहकारींनी नुकतेच विजयदुर्ग येथील सुनसान जागेतील बसस्टाँपमधे अत्यंत दयनिय स्थीतीत राहत असलेल्या ४५ वर्षाच्या मनोरूग्ण महिलेला संस्थेच्या पणदूर येथील संविता आश्रमात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या सुनसान जागेतील बसस्टाँप च्या तीन किलोमीटर परिसरात साधे एखादे घर दुकान किंवा हाँटेल नव्हते.अशा ठिकाणी ही महिला मानसिक आजारी अवस्थेमुळे नाईलाजाने निराधार व वंचित स्थीतीत राहत होती. सदर महिला गेले दिड महिन्याहून अधिक काळ विजयदुर्ग येथील परिसरात निराधार आणि वंचित अवस्थेत आणि अत्यंत दयनिय स्थीतील राहत असल्याची माहिती विजयदुर्ग पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक श्री देवरेसाहेब यांनी सविता आश्रमाच्या श्री संदिप परब यांना कळविली. तेव्हा संदिप परब आणि आश्रमच्या कार्यकर्त्यांनी रातोरात तात्काळ आश्रमपासून सुमारे ८० किमीवरील विजयदुर्ग गाठले. आणि संविता आश्रमचे कार्यकर्ते महाबळेश्वर कामत, लिना पालकर आणि ज्योती आंगणे यांचेसह विजयदुर्ग येथील सुनसान जागेत निराधार व वंचितावस्थेत जीवन जगत असलेल्या दुर्गा या महिलेस संविता आश्रमात आणून दाखल केले. महिलेच्या एकंदर हावभावावरून ती दक्षिण भारतीय आसल्याचे जाणवत आहे.तीचे नाव गाव अद्याप समजले नसल्याने आणि विजयदुर्ग मधे सापडली म्हणून सोईसाठी दुर्गा असे नाव आश्रमच्या वतीने तूर्तास तिला देण्यात आले आहे. गणपती उत्सवानंतर लवकरच आता गावोगावी दुर्गा मातेची पुजा केली जाईल. मात्र आज संदिप आणि त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी एका हाडामासाच्या माणूस असलेल्या निराधार महिलेला तथा दुर्गेला …जणू संविता आश्रमरूपी मंदिरात आणून तीची मानोभावे प्रतिष्ठापना केली आहे.असे म्हटले तर वावगे ठरू नये. कुडाळसह सिंधुदुर्ग मधील सुप्रसिध्द मानसोपचार तज्ञ डाँ.धुरी यांचेकडे माहिलेवर मानसोपचार करण्यात येत आहेत. विजयदुर्ग पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक देवरेसाहेब व श्री जाधव साहेब यांनी सदर महिलेला दाखल करण्यासाठीच्या पोलिस प्रक्रीयेत मोलाचे सहकार्य केले.तर देवरेसाहेब हे ओरोस पोलिस स्टेशनमधे कार्यरत असल्यापासून संविता आश्रमच्या कामाशी परिचित आहेत.दरम्यान विजयदुर्ग येथे राहत असलेल्या जीवन आनंद संस्थेच्या हितचिंतक डाँ.पुजा मालपेकर आणि त्यांचे चिरंजिव निनाद मालपेकर यांचे याकामी मोलाचे सहाकार्य लाभले. रस्त्यावरच्या निराधार मनोरूग्ण जख्मी आजारी,वाट चुकलेल्या माणसांना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन मिळावे. त्यांचे कुटुंब पुनर्मिलन आणि सुयोग्य पुनर्वसन व्हावे या हेतुने संदिप परब यांच्या जीवन आनंद संस्थेचे मुंबई, पालघर, ठाणे ,सिंधुदुर्गसह गोवा राज्यातही आश्रम आणि शेल्टर होम द्वारे कार्य चालते.

error: Content is protected !!