कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहर झपाट्याने वाढत असताना मुंबई गोवा हायवे लगत एक सुद्धा सुलभ शौचालय नसल्याने खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय होत आहे. ही बाब कणकवली न. पं. प्रशासनाने गांभीर्याने घेऊन शहरात विविध ठिकाणी सुलभ शौचालयाची व्यवस्था करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. आप्पासाहेब पटवर्धन चौकात जुन्या भाजी मार्केटचे सुलभ शौचालय होते परंतु ते नवीन बांधकामा करिता एप्रिल ते मे महिन्यात तोडण्यात आले ते अद्यापही पूर्ण झाले नाही. शहरात कुठेही शौचालयाची सोय नसल्याने मुंबई येथून येणारे चाकरमाने तसेच खरेदीसाठी येणाऱ्यांची गैरसोय होत आहे.
कणकवलीत हायवेलगत एकही पब्लिक टॉयलेट नाही; गणेशभक्त प्रवाशांची गैरसोय












