कणकवली (प्रतिनिधी) : येथील प्रतिथयश व्यापारी व निवृत्त एसटी कर्मचारी सुनील अनंत पाटील (५९) यांचे सोमवारी कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. मूळ कलमठ – कुंभारवाडी येथील असलेल्या सुनील यांनी सुरुवातीला एसटीमध्ये मॅकॅनिकल म्हणून सेवा बजावली. त्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन कणकवली शहरातील तेलीआळी येथे गुरुकृपा मसाले नावाने दुकान सुरु केले. त्यात जम बसल्यानंतर त्यांनी याच दुकानालगत संत गजानन कलेक्शन या नावाने कापड दुकानही सुरु केले. गेल्या काही वर्षांत त्यांनी दोन्ही व्यवसायात चांगला जम बसवला व ही दोन्ही दुकाने ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. मनमिळावू स्वभाव व सामाजिक, सांस्कृतिक कार्यातही योगदान असल्याने ते कणकवली शहरात सुपरिचित होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. सुनील हे मसाले व कापड व्यापारी स्वप्नील पाटील, गणेश पाटील यांचे वडील होत.
सेवानिवृत्त एसटी कर्मचारी तथा व्यापारी सुनील पाटील यांचे निधन












