काळसेत कै.विजया मोरेश्वर परब प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला माजी सैनिकांचा सन्मान
शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
चौके (अमोल गोसावी) : काळसे गावचे सुपुत्र तथा कै. सौ. विजया मोरेश्वर परब प्रतिष्ठान पुणे चे अध्यक्ष श्री. प्रशांत परब आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गणेशोत्सवानिमित्त काळसे येथे आले असताना सामाजिक बांधिलकी जोपासताना कै. सौ. विजया मोरेश्वर परब प्रतिष्ठान पुणेच्या वतीने काळसे वरचावाडा येथील ब्रिगेडियर विजय प्रभु , सुभेदार मेजर यशवंत गोपाळ परब , नाईक प्रताप नांदोसकर , नाईक प्रमोद दळवी , नाईक विजय प्रभु या माजी सैनिकांचा शाल श्रीफळ व गौरवचिन्ह देउन यथोचित सन्मान केला . त्याचप्रमाणे काळसे भंडारवाडा प्राथमिक शाळा ,व भंडारवाडा व धनगरवाडा अंगणवाडी या शाळेतील २५ विद्यार्थ्यांना छत्री व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच वरचा वाडा येथील दहावी बारावीच्या परीक्षेत ७०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या सहा विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. आणि येथील श्री. विवेक शांताराम प्रभु यांनी ( P. H. D.) डॉक्टरेट पदवी संपादन केल्याबद्दल त्यांचाही गौरवचिन्ह देउन सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परब , सौ. प्राप्ती परब , सौ. प्रियांका परब , प्रेरणा परब , प्रतिक्षा परब , साईप्रेम परब , आरती परब , प्रीतम परब , सुभाष रेवडेकर , गुरू परब , नेरुरकर गुरुजी , सौ. काळसेकर मॅडम , सौ. वैशाली प्रभु आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.