भाजपा युवा नेता विशाल परब यांच्या वाढदिनी सामाजिक सांस्कृतिक उपक्रम

माजी खासदार निलेश राणेंच्या उपस्थितीत 9 ऑक्टोबर रोजी होणार वाढदिवस सप्ताह चा शुभारंभ

इंदुरीकर महाराज कीर्तन करणार सादर

पॉप सिंगर ज्युबिन ची असणार उपस्थिती, दांडिया खेळ पैठणीच्या कार्यक्रमाने येणार रंगत

सावंतवाडी (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी चे युवा नेते तथा युवा उद्योजक श्री विशाल प्रभाकर परब यांचा वाढदिवस १५ ऑक्टोबर 2023 रोजी विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा होत आहे याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी कुडाळ व दोडामार्ग या ठिकाणी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात पॉप सिंगर जुबिन नौटियाल यांच्यासह इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचा कार्यक्रम जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती भाजपाचे जेष्ठ नेते दत्ता सामंत यांनी आज सावंतवाडी येथील शिल्पग्रम येथील आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली त्यावेळी दत्ता सामतः बोलत होते

यावेळी माजी जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, माजी नगराध्यक्ष संजू परब, तालुकाध्यक्ष दादा साईल, जिल्हा उपाअध्यक्ष बाळु देसाई, माजी नगरसेवक मनोज नाईक, मोहन सावंत, बड्या सावंत, प्रकाश मोर्ये, रुपेश कानडे तेजस माने आदी उपस्थित होते

या सोहळ्याचा शुभारंभ कुडाळ येथे १ तारखेला माजी खासदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता इंदुरीकरण महाराजांच्या किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे तर १९ तारखेला दोडामार्ग येथे सिने अभिनेता क्रांती मळेगावकर यांच्या उपस्थितीत न्यू होम मिनीस्टर खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. १३ ऑक्टोबरला वेंगुर्ले येथील कॅम्प स्टेडीयम मध्ये भव्य दांडीया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा समारोप १५ ऑक्टोबरला सावंतवाडी येथे होणार आहे वाढदिवसाच्या मुख्य कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण तसेच जिल्ह्यातील भाजपाचे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत कापण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता पॉप सिंगर जुबिन नौटियाल याचा लाईव्ह गाण्याचा शो होणार आहे या कार्यक्रमाचा सर्व जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांनी आणि विशाल परब यांचाही आनंद घ्यावा, असे आवाहन यावेळी श्री सामत यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!