कणकवली (प्रतिनिधी): कणकवली पं स चे सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांना कणकवली गटविकास अधिकारी ( उच्च स्तर वर्ग 1 ) पदी बढती मिळाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पं स च्या गटविकास अधिकारी दालनात नामदेव जाधव यांनी पुष्पगुच्छ देत बीडीओ चव्हाण यांचे बढतीबद्दल अभिनंदन केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी सूर्यकांत वारंग, सहाय्यक प्रशासन अधिकारी अनिल चव्हाण, नीलिमा जाधव, शाखा अभियंता विनायक चव्हाण, ग्रामविस्तार अधिकारी अनिल जाधव, सत्यविजय जाधव आदी उपस्थित होते.
गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांचा सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाजाच्या वतीने करण्यात आला सत्कार
