मला बोलवा…एकटा येतो तुमच्या होऊ द्या चर्चेत

भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांचे उबाठा सेनेला आव्हान

कणकवलीत पोईप मधील घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता

कणकवली (प्रतिनिधी): उबाठा सेनेकडून आज सायंकाळी साडेपाच वाजता कणकवली शहरात बीजेपी च्या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची पोलखोल करणारा होऊ द्या चर्चा कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमासाठी भाजपा पदाधिकारी म्हणून मी एकटा येतो, मला बोलवा असे थेट गर्भित आव्हान भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी दिला आहे. आज सकाळी कणकवलीत पत्रकार परिषदेत संदीप मेस्त्री यांनी उबाठा सेनेला हे थेट आव्हान दिल्यामुळे कणकवलीत आज उबाठा सेनेच्या होऊ द्या चर्चेत राजकीय राडा होणार काय ? पोईप मध्ये आमदार वैभव नाईक यांच्यासमोर घडलेल्या घटनेचा पुढील अंक आज कणकवलीत घडणार काय ? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. संदीप मेस्त्री यांनी दिलेल्या आव्हानामुळे कणकवली शहरात राजकीय वातावरण तंग होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!