ठाकरे सेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर यांचे नगरसेवक पद गेले

कोकण विभागीय आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी अपात्रतेवर केले शिक्कामोर्तब

देवगड (प्रतिनिधी): देवगड जामसंडे नगरपंचायत चे तत्कालीन उबाठा सेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर यांचे नगरसेवक पद गेले असून खेडेकर हे नगरसेवक पदाला अपात्र असल्यावर कोकण विभागीय आयुक्त डॉ राजेंद्र शिंदे यांनी शिक्कामोर्तब केले आहे. आयुक्त शिंदे यांनी 5 ऑक्टोबर रोजी याबाबत चा आदेश काढला असून नगरसेवक पदाला रोहन खेडेकर अपात्र असल्याचे स्पष्टपणे निकालात नमूद केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी रोहन खेडेकर यांचा नगरसेवक पदावर अपात्र असल्याचा आदेश कायम ठेवताना खेडेकर यांनी केलेले अपील फेटाळले आहे. त्यामुळे देवगड जामसंडे नगरपंचायत च्या प्रभाग 7 मध्ये लवकरच पोटनिवडणूक लागणार हे निश्चित झाले आहे.भाजपाचे कार्यकर्ते योगेश चांदोसकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर नगरसेवक रोहन खेडेकर यांना सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले होते. रोहन खेडेकर यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे याविरोधात अपील दाखल केले होते.5 ऑक्टोबर रोजी या अपिलावर निर्णय देताना सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कायम ठेवत खेडेकर याना नगरसेवकपदी कायम ठेवण्याचे कोकण विभागीय आयुक्तांनी अमान्य केले आहे. कोकण आयुक्तांकडे या अपिलाची सुनावणी सुरू असण्याच्या दरम्यान रोहन खेडेकर यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत अलीकडेच प्रवेश केला होता.मात्र तरीही कायदेशीर लढाईत भाजपा कार्यकर्ते योगेश चांदोसकर यांनी बाजी मारली असून खेडेकर याना आपले नगरसेवक पद गमवावे लागले आहे.

error: Content is protected !!