प्रथम क्रमांकाचे विजेते कुणकेश्वर येथील पुंडलिक नाणेरकर
कणकवली ( सत्यवान गावकर ): कोकण म्हटलं की प्रत्येकाच्या जीवाभावाचा विषय आणि त्यात “गणेश चतुर्थी” म्हटले की अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांमध्ये बाप्पाच्या आगमनाच्या तयारीची ऊर्जा पाहायला मिळते. रंगरंगोटी, सजावट ह्या गोष्टी आपला कोकणकर अगदी आनंदाने आणि उत्साहाने करतो त्याच गणेश भक्तांच्या आनंदात चार चांद लावण्याचे काम गेली दोन वर्ष अविरतपणे चालू ठेवलेल्या आपल्या कणकवली तालुक्यातील स्नेहांश इंटरटेनमेंट च्या सभासदांनी गेली दोन वर्ष स्नेहांश इंटरटेनमेंट आयोजित भव्य जिल्हास्तरीय गणेश सजावट स्पर्धा घेतली जात आहे आणि या स्पर्धेला जिल्ह्यातील गणेश भक्तांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात लाभतोय याही वर्षी जिल्हास्तरीय गणेश सजावट स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून या भव्य दिव्य जिल्हास्तरीय गणेश सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे विजेते पुंडलिक नाणेरकर रा. कुणकेश्वर चांदेल वाडी, द्वितीय क्रमांक गोविंद राजा दळवी रा. तळगाव दारवळवाडी, तृतीय क्रमांक संदीप पंढरीनाथ फोपळे रा.मोगरणे फोपळेवाडी उत्तेजनार्थ प्रथम मिलिंद सुरेश वेंगुर्लेकर रा.बाव ब्राह्मणवाडी ,उत्तेजनार्थ द्वितीय संतोष दिगंबर राणे कणकवली टेंबवाडी, उत्तेजनार्थ तृतीय विशाल मिराशी चांदोशी मिराशी वाडी या स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा समारंभ मान्यवरांच्या हस्ते दिनांक 15 ऑक्टोबर 23 ऑक्टोबर या दरम्यान घेण्यात येणार असून स्नेहांश इंटरटेनमेंट मार्फत ती तारीख कळविण्यात येणार आहे. या स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना देखील ऑनलाइन प्रमाणपत्र पाठविण्यात येईल या स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांचे त्याचबरोबर विजेत्यांचे स्नेहांश इंटरटेनमेंट च्या वतीने खूप अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.











