1 कोटी च्या अपहार प्रकरणी प्रशांत मारुती शिंदे चा जामीन नामंजूर

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद

आरोपी प्रशांत शिंदे च्या जेलमुक्कामात वाढ

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): भीमरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था स्थापन करून शासनाच्या 1 कोटी रकमेचा अपहार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी प्रशांत मारुती शिंदे ( वय 50, रा.जुने एसटी स्टँड बाजूला, इचलकरंजी ,कोल्हापूर ) याचा जामीन अर्ज प्रधान व सत्र जिल्हा न्यायाधीश संजय भारुका यांनी नामंजूर केला. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी यशस्वी युक्तिवाद केला. भीमरत्न संस्थेचा सचिव असलेल्या प्रशांत शिंदे व अन्य 12 आरोपींनी 1 कोटी 22 लाख 66 हजार 640 रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद तत्कालीन उपलेखा परीक्षक प्रशांत दळवी यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली होती. हा गुन्हा 2008 ते सन 2015 मुदतीत घडला होता. दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 7 जानेवारी 2019 रोजी आयपीसी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी प्रशांत शिंदे याला 26 ऑगस्ट 2023 रोजी अटक करण्यात आली होती. सध्या आरोपी शिंदे हा न्यायालयीन कोठडीत असून त्याने जामीन साठी अर्ज दाखल केला होता.त्याला हरकत घेताना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तोडकरी यांनी आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता, संस्था सचिव म्हणून आरोपी प्रशांत शिंदे हा मुख्य सूत्रधार असून त्याने बनावट दस्तऐवज बनवून 90 लाखांचा ओडी घेऊन य गुन्ह्यातील आरोपी असलेला चुलत भाऊ महेश शिंदे यांच्या खात्यात सदर रक्कम वळती केली. चुलत भाऊ महेश च्या खात्यातील 90 लाख रुपयांचे काय केले ?याबाबत आरोपी प्रशांत ने माहिती दिली नाही, आरोपी प्रशांत हा परजिल्ह्यातील असून तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, संस्था सचिव असलेल्या आरोपी प्रशांत ने संस्थेची महत्वाची दस्तऐवज तपासकमी दिली नाही, यातील सहआरोपी शुभांगी बाळकृष्ण कदम ( रा.सांगवे, ता कणकवली ) हिला अजून अटक करायची असून आरोपी प्रशांत ला जामीन मिळाल्यास तो आरोपी शुभांगी हिला सामील होण्याची शक्यता आहे. तोडकरी यांच्या यशस्वी युक्तिवादानंतर आरोपी प्रशांत चा जामीन अर्ज न्यायाधीश भारुका यांनी फेटाळला असून प्रशांत शिंदे च्या जेलमुक्कामात वाढ झाली आहे.

error: Content is protected !!