झुंजार मित्र मंडळ खारेपाटण आयोजित नवरात्रौत्सव उस्तव कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

लकी ड्रॉ च्या माध्यमातून विविध आकर्षक बक्षिसे

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील झुंजार मित्र मंडळ खारेपाटण यांच्यावतीने दरवर्षी सार्वजनिक नवरात्रोत्सव उस्तव मोठ्या धुमधडक्यात साजरा करण्यात येत असतो.दरम्यान यंदा नवरात्रोत्सव उस्त्वाच्या पार्श्भूमीवर खारेपाटण शिवाजीपेठ येथे नुकतेच मंडळाच्या नवरात्रोत्सव उस्तव संपर्क कार्यालयाचे उद्घघाटन युवा सामाजिक कार्यकर्ते चिन्मय शिंदे व झुंजार मित्र मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दादा कर्ले यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी झुंजार मित्र मंडळाचे अध्यक्ष संकेत शेट्ये,मंडळाचे कार्यकर्ते महेश कोळसुलकर,रमेश जामसंडेकर,अनंत गांधी,बाळा शेट्ये, तेजस राऊत,भूषण कोळसुलकर, किरण कर्ले,संतोष गाठे,संकेत लोकरे,प्रज्योत मोहिरे,गणेश लवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सार्वजनिक नवरात्रोत्सव संपर्क कार्यालयाला खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर व सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. खारेपाटण शिवाजी पेठ झुंजार मित्र मंडळ खारेपाटण यांच्या सोजण्याने खारेपाटण मध्ये प्रथमच अल्फा टी व्ही एस टू व्हीलर गाड्यांचा कमी डाऊन पेमेंट मध्ये विक्री सेल व एकसेंज ऑफर लेलवा देखील सलग १५ दिवसासाठी भरविण्यात आला आहे. त्याचा देखील शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी मॅनेजर सूयोग गावडे,फायनान्स विभाग प्रमुख सौरभ सावंत उपस्थित होते. खारेपाटण येथील नवरात्रोत्सव निमित्त झुंजार मित्र मंडळाच्या वतीने यंदा लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले असून मोटार सायकल,फ्रिज, वॉशिंग मशीन,एल ई डी टि.व्ही. सायकल,मिक्सर आदी अनेक विविध बक्षिसे ठेवण्यात आली असून त्याचा शुभरांभ देखील आज मंडळाचे अध्यक्ष संकेत शेट्ये यांच्या शुभहस्ते लकी ड्रॉ तिकीट बुक वितरीत करून करण्यात आला. झुंजार मित्र मंडळाच्या वतीने यंदा नवरात्रोत्सवात नऊ दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून लकी ड्रॉ कूपन स्पर्धेचा वितरण शुभारंभ आज पासून करण्यात आला असून दशक्रोशितील नागरिकांनी या सार्वजनिक नवरात्रौत्सव कार्यक्रमास सहकार्य करावे असे आवाहन झुंजार मित्र मंडळाचे अध्यक्ष संकेत शेट्ये यांनी केले आहे.

error: Content is protected !!