रिक्षा पूर्णपणे जळून खाक
कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील नेरुर वाघोसेवाडी येथील सदानंद उर्फ नंदू खवणकर यांच्या घरासमोर लावलेली रिक्षा अज्ञात इसमानी जाळून टाकली आहे. ही रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली आहे रात्री अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून ही रिक्षा का जळण्यात आली त्याचे नेमके कारण स्पष्ट समजलेले नाही. दरम्यान आज सकाळी शिवसेना ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास कुडाळ पोलीस करत आहेत.











