‘मेरी माटी, मेरा देश’ या कार्यक्रमामागचा विचार, भावना आत्मसात करा आ. नितेश राणे यांचे जनतेला आवाहन
मेरी माटी, मेरा देश’ अभियान; कणकवली पंचायत समितीतर्फे ढोलताशांच्या गजरात उत्सवी अमृत कलश यात्रा
कणकवली (प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘मेरी माटी, मेरा देश’ हे अभियान देशभर राबविले जात आहे. विकासाचे लक्ष साध्य करणे व मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी व रक्षणार्थ आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांच्या सन्मानार्थ या अभियानाचे आयोजन केले आहे. या अभियानांतर्गत देशभरातील सर्व गावे व शहरातील माती अमृत कलशात संकलित करून पुढे दिल्ली येथे या माताची वापर करून शूरवीरांच्या स्मरणार्थ ‘अमृत वाटिकेची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये प्रत्येकाने खारीचा वाटा उचलवावा, ज्या मातीत आपण जन्म घेतला आहे त्या मातीचे ऋण फेडण्यासाठी केवळ एक दिक्सा पुरते नव्हे तर कायम मनात भावना ठेवा. या कार्यक्रमामागचा विचार, भावना आत्मसात करा असे आवाहन आम. नितेश राणे यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वाच्या समारोपीय कार्यक्रमानिमित्त केंद्र सरकारकडून ‘मेरी माटी, मेरा देश’ हे अभियान राबविले जात आहे. या अभियांनातर्गत कणकवली पंचायत समितीतर्फे तालुक्यातील सर्व ग्रापंचायतीतर्फे गावातील मातीने भरलेल्या अमृत कलशांची छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पंचायत समितीपर्यंत ढोलताशांच्या गजरात उत्सवी वातावरणात अमृत कलश यात्रा काढण्यात आली. यानिमित्त पं.स.च्या इमारती समोर आयोजित केलेल्या कार्यक्रमात आम. नितेश राणे बोलत होते. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी सभापती मनोज रावराणे, जि. प. चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्राजक्त तनपुरे, श्री. काळे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, सुनील पांगम, रवी मेस्त्री, प सं च्या सामान्य विभागातील अधिकारी मनीषा देसाई, अनिल चव्हाण, सी. डी. परब, माजी उपसभापती प्रकाश पारकर, मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, भाजपच्या अनूसूचित जाती व जमाती विभागाचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव आदी उपस्थित होते. आम. नितेश राणे म्हणाले,
भारत देश महासत्ता बनविणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने योगदान दिले पाहिजे. केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. तालुक्यातीत प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रा. पं. सदस्य आणि प्रशासनाने त्या प्रभावीपणे राबविल्या पाहिजेत. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खमके नेतृत्व लाभल्यामुळे आपला देश सर्व बाबतीत लवकरच आत्मनिर्भर बनेल, असा विश्वास आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केला. आपला देश, राज्य, जिल्हा, तालुका व गावाचा सार्वगीण विकास होण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आहेत. या योजना ग्राम, तालुका, जिल्हा स्तरावर प्रभावीपणे राबविण्याचे जबाबदारी लोकप्रतिनिधींनी आहे, ही जबाबदारी त्यांनी सक्षमपणे पार पाडावी. याशिवाय नरेंद्र मोदी यांचे ५ ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेचे स्व असून ते स्वप्न २०३० पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अमृत महाआवास अभियान सन २०२१-२२ व २०२२-२३ मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते अमृत महाआवास अभियान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आरंभी मान्यवरांचे स्वागत अरुण चव्हाण यांनी केले. यावेळी राजेश कदम यांनी पंचप्राणाची शपथ दिली. प्रास्ताविक अरुण चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. आभार सूर्यकांत वारंग यांनी मानले. यावेळी पंचायत समितीचे कर्मचारी, सरपंच, ग्रा. पं. सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी महा आवास अभियान 2021-22 मधिल उत्कृष्ठ काम करणाऱ्या संस्था / व्यक्तिंना “अमृत महाआवास अभियान” पुरस्कार देण्यात आले यामध्ये तालुकास्तरीय पुरस्कार : अ) प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 1. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत) 1) बोर्ड, 2) तोरे, 3) नरडवे सर्वोत्कृष्ट घरकुल 1) रुपेश अंकुश सावत, तोरे 2) वृषाली राजाराम घाडीगावंकर, हरकुळ बु. 3) चंद्रकांत विष्णु
शिंदे, घोणसरी
ब) रमाई आवास योजना सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत 1) विरक्त
2) कासार्डे, 3) हरकुळ खुर्द
सर्वोत्कृष्ठ घरकुल 1) नामदेव सहदेव तांबे, दारिस्ते, 2) सुमती देवु कांबळे, साळीस्ते 3) भिकाजी सोनु जाधव, साकेडी
अमृत महाआवास अभियान 2022-23 मधिल उत्कृष्ठ काम करणाऱ्या – संस्था / व्यक्तिंना “अमृत महाआवास अभियान” पुरस्कार देण्यात आले यामध्ये तालुकास्तरीय पुरस्कार : अ) प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. 1. सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत1) बोर्डवे, 2)
हळवल, 3) खारेपाटण
सर्वोत्कृष्ठ घरकुल1) बाबु लक्ष्मण कारेकर, रा. बोर्डवे, 2) तुलसी मनोज पालकर, रा. हळवल, 3) नाना आकाराम कर्ले, रा. खारेपाटण
ब) रमाई आवास योजना
सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत 1 ) कासार्डे
2) ओसरगाव, 3) कसवण तळवडे
सर्वोत्कृष्ठ घरकुल 1) धोंडु बाळकृष्ण जाधव, रा. कासार्डे 2) सविता केशव तांबे, रा. ओसरगाव 3) रुपेश रामा सर्पे, रा. कसवण तळवडे यांना गौरविण्यात आले.











