कणकवली (प्रतिनिधी): राज्य सरकार मोठमोठ्या घोषणा करत योजना जाहीर करत आहे आणि दुसऱ्या बाजूला मोक्याच्या जागा उद्योजकांना देत आहे. आधी शाळा दत्तक दत्वावर खाजगी उद्योजकांना देण्याचा जीआर काढला, आता शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रे खाजगी एजन्सीला देण्याचा जीआर काढला आहे.सत्तेतील किंवा विरोधी पक्षातील आमदार मागील 9 वर्षांत जनतेकडे दुर्लक्ष केले.ह्या सर्व लोकप्रतिनिधींनी आरोग्य सेवेचा खेळखंडोबा केला आहे.मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल केव्हा होणार आणि जनतेला कधी आरोग्य सेवा मिळणार ह्याचा थांगपत्ता नाही. खा. विनायक राऊत यांनी सावंतवाडी टर्मिनस चा मुद्दा संसदेत कधी उपस्थित केला नाही. मडूरा आणि सावंतवाडी रेल्वे स्टेशन वाद दीपक केसरकर पालकमंत्री असल्यापासून आहे. रत्नसिंधु योजनेतून सावंतवाडी रेल्वे टर्मिनस ला निधी देणार असल्याचे सांगून केसरकर पुन्हा जनतेला फसवत आहेत.देवगडला घेतलेल्या बैठकीत जनतेसाठी काहीतरी करत असल्याचा आभास आमदार नितेश राणेंनी केला. मागील 9 वर्षातील साडेसात वर्षात आणि आता सत्तेत असतानाही आमदार नितेश राणे देवगड ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर, नर्स प्रशासकीय स्टाफपदे रिक्त आहेत. आता राज्य सरकारने महाबळेश्वर तालुक्यातील 2 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 14 उपकेंद्रे 5 वर्षांकरिता शासकीय रुग्णालये खाजगी एजन्सी ला चालवायला दिली आहेत. ही आरोग्य यंत्रणांचे खाजगिकरणाची सुरुवात आहे. गोरगरीब जनतेची या खाजगिकरणातून आर्थिक लूट होणार आहे. वाढत्या महागाईत आम जनतेला आजारी पडणे सुद्धा महाग पडणार आहे.
सरकारी शाळांपाठोपाठ शासकीय रुग्णालयेही खाजगी एजन्सीच्या घशात – परशुराम उपरकर











