धामापूर येथे पोस्टाच्या वतीने ” डाक चावडी ” कार्यक्रम संपन्न

सरपंच मानसी परब यांची प्रमुख उपस्थिती

चौके ( अमोल गोसावी ) : डाक सामुदायिक विकास कार्यक्रम ( DCDP ) अंतर्गत सिंधुदुर्ग डाक विभागाच्या वतीने धामापूर ग्रामपंचायत सभागृह येथे आज डाक चावडी हा कार्यक्रम घेण्यात आला. नागरीकांना पोस्टाच्या सर्व सेवा आणि सुविधा एकाच वेळी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दरम्यान धामापूर सरपंच मानसी परब यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ धामापूर येथे करण्यात आला. यावेळी उपसरपंच रमेश निवतकर , महेश परब , डाक अधिक्षक मयुरेश कोले , सचिन पान ढवळे , एम. एम. आर्लेकर , संतोष मिराशे , राजू कराड , संजय मर्तल , भाऊ काळसेकर , ज्ञानेश्वर आळवे , आदी जण उपस्थित होते. धामापूर गावातील अनेक ग्रामस्थांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. यावेळी सरपंच मानसी परब यांनी पोस्ट ऑफिस मार्फत लावण्यात आलेल्या कॅंप बद्दल सर्व पोस्ट अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!