आ.नितेश राणेंनाच भिडले | युवासेनेने गौरविले

देवगड (प्रतिनिधी): देवगड ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या मेडिकल आणि पॅरामेडिकल स्टाफ वरून आमदार नितेश राणेंना जाब विचारणाऱ्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज विशेष सत्कार केला. सुशांत नाईक यांनी आमदार नितेश राणेंना होऊ द्या चर्चा असे आव्हान देत देवगड कणकवली वैभववाडी तालुक्यातील स्थानिक पातळीवरील 10 प्रश्न विचारले होते.त्यात एक प्रश्न आरोग्य व्यवस्थेचा होता. नेमका हाच प्रश्न देवगड तालुका युवासेना तालुकाध्यक्ष गणेश गावकर , शिवसेना तालुकाप्रमुख जयेश नर यांनी आमदार नितेश राणेंना विचारला. आणि त्यानंतर शेकडो भाजपा कार्यकर्ते आणि मोजके 15 शिवसैनिक यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन झटापट झाली. जिगर दाखवून खुद्द आमदार नितेश राणेंना त्यांच्याच समक्ष जाब विचारणाऱ्या गणेश गावकर याचा आज सुशांत नाईक यांनी भगवी शाल घालून सत्कार केला.जनतेच्या प्रश्नांसाठी असेच आवाज उठवत राहा. पक्षप्रमुख आणि युवासेना प्रमुख यांच्यासह आम्ही सर्व आपल्या पाठीशी आहोत असा विश्वासही दिला. यावेळी देवगड तालुकाप्रमुख जयेश नर, युवासेना जिल्हा समन्वयक राजु राठोड, तालुका प्रमुख उत्तम लोके, तालुका समन्वयक तेजस राणे, फोंडा विभागप्रमुख सिद्धेश राणे,कणकवली उपशरप्रमुख वैभव मालडकर, नितेश भोगले, रोहित राणे, किरण वर्दम, प्रतिक रासम, प्रसाद चव्हाण, महेश राणे, गुरुनाथ पेडणेकर,चेतन पाटील आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!